Friday, September 25, 2020

Corona काळातील नटसम्राट ? नाही फक्त corona योद्धा

"To पी or not to पी that is the question" (येथे पी हा इंग्रजीतला पी नसून मराठीतला पी आहे)
पाणी द्यावं की नाही हा एकच सवाल आहे...
एका मरणार्‍या माणसाला पाणी द्यावं की मरू द्यावं त्याला लाचार बेबस आणि तहानलेला.... .

Of course पाणी द्यावं... हेच उत्तर अपेक्षित आहे ना..
पण तुमच्या पाणी दिल्याने त्या माणसाची वाचण्याची शक्यता कमी होणार असेल तर??
मग मात्र विचार करावा लागेल...
असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला. मी  ward 8 मधे COVID+Noncovid  ड्युटी करत होतो. नेहमी पेक्षा patients जरा जास्तच होते. ड्यूटी मध्ये 
आल्यापासून एक मिनीट पण बसायला ही वेळ मिळालं नव्हताच आणि त्यात PPE मुळे त्रास आणखीनच जाणवलेला होता.त्यामुळे dehydration जरा जास्तच झालेले. दिवस खूप त्रासदायक गेल्याने कसातरी रात्री आराम कराव म्हणलं पन रात्रीची झोप व्यवस्थित ही झाली नाही रात्रभर ही पेशंट होते. DCHC मध्ये साधारणपणे 8 patients असतील. सकाळी सकाळी 7chya दरम्यान PPE kit घालून राऊंड घ्यायला सुरुवात केली.व हा राऊंड झाल्यानंतर 8 वाजल्यानंतर COVID care centre la असलेले 145 patients चा राऊंड मलाच घ्यायचा व नोट्स मलाच लिहायच्या असल्याने हा राऊंड लवकर आटपून तिकडे जाण असल्याने गडबड होतीच . त्यात सकाळचा नाश्ता केलेला ही नव्हताच खूप irritate होत होत. त्यात हे PPE कीट 
.या वार्ड मधील एक शेवटचा Patient  तपासत होतो .हा stable patient होता.सर्वांचे SpO2 समाधानकारक होते. 8 patients असतील सर्व patients पाहीले होते , 'हे काम आटोपून आता नाश्ता  मिळणार व लवकर आराम भेटेल असे असतानाच PPE मुळे ओघळणार्‍या घामाला जरा पंख्याचा वारा लागणार' ह्या विचारानेच बरं वाटत होतं. तितक्यात casualty मध्ये एक पेशंट श्वास घेण्यास त्रास असलेला आलाच  .एक पेशंटचा नातेवाईक ward च्या बाहेर धावत आला.व म्हणाला 
"डॉक्टर , वडिलांना बघा ना ;त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होतोय" हातातलं काम आटोपून मी त्या पेशंटला बघायला गेलो.patient la PPE कीट घालूनच बघायला लगेच मला जावे लागले.  मला तिळमात्रही कल्पना नव्हती की पुढे काय प्रसंग ओढवणार होता.
पेशंटचं वय 70 असावं. त्यांना घाम फुटला होता. Respiratory rate वाढला होता आणि श्वास घ्यायला होणारा त्रास त्यांचा चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होत होता.त्यांना मी लगेच; परिस्थिती बघून पटकन O2 मास्क लावला.oxygen saturation बघीतले ते कमी झाले होते Spo2 फक्त 70% .o2 8 लिटर वर व injections sisterla द्यायला लावल्यामुळे  ते दिल्याने थोडे स्थिरावले होते.असे emergency पेशंट नेहमीच casualty मध्ये येत राहतात. पण आत्ता Covid pandemic असल्याने मी काळजीपूर्वक patient पाहून त्यांची emergency COVID-19 Antigen test केली ती positive आली.सोबत आलेले 5 ते 6 नातेवाईक कमी झाले तेथून ते निघून गेले फक्त त्या बाबाचा मुलगा व त्या बाबाची बायको फक्त राहीलेली. 
आणि त्यानंतर पेशंट ला स्थिर करून 108 ने पुढे पाठविण्याचा निर्णय घेतला कारण अशा पेशंट ला आणखी उच्चतम treatment ची गरज असते. .परिस्थिती अजूनही बिकट होती कारण 108 ची एम्बुलेंस आम्हाला गरजेला आधार असलेली 30 minute उशीराच येणार होती नेहमीप्रमाणेच. माझी duty संपलेली असताना देखील तरीही मला तिथेच थांबवे लागले . कारण मला त्या patient ला सोडून PPE कीट काढून निघुन जाणे सार्वजनिक आरोग्य विभागात काम करत असताना किंवा कोठेही कोणालाही परवडणारे नाही. लक्ष्मणरेषेवर उभा असलेला हा patient मला वाटत होता.
"काका बरं वाटतयं ना" मी विचारलं... त्यांनी हाताने thumps up 👍 करून दाखवलं कारण काही बोलण्याच्या परिस्थितीत ते नव्हते.
तरी देखील ते काहीतरी पुटपुटले.
त्यांच्या मास्क आणि माझ्या PPE मुळे मला ऐकू नाही आलं.
"काय झालं काका" त्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेत मी परत विचारलं...
पाणी हवं असल्याचे त्यांनी इशाऱ्याने सांगितले.
आता खरी कसोटी होती...
पाणी पाजायचं म्हणजे मास्क काढावा लागणार आणि अशा परिस्थितीत काही सेकंड जरी मास्क काढला तरी oxygen saturation एकाएकी ड्रॉप होऊन पेशंट दगावू शकतो.
पण पाणी नाही पाजलं अणि तरीही ते दगावले तर!!!
एका मरणार्‍याला शेवटचं पाणी देखील आपण देऊ शकलो नाही ही खंत मनात राहणार. 

एक डॉक्टर म्हणून विचाराल तर तो म्हणतो की जीव वाचवणं महत्त्वाचं..
1% जरी चान्स असेल तरी प्रयत्न सोडू नका.. आणि माणुसकी म्हणते मरणाऱ्याला पाणी देखील पाजणार नाही.. इतके निर्दयी आहोत का आपण?
मग अशा वेळी डॉक्टर म्हणून वागावं की माणूस म्हणून...??? 

"एक तरफ खाई तो दुसरी तरफ कुआँ। "
एकीकडे माणुसकीच्या नात्याने पाणी पाजावं आणि पेशंट दगावला तर डॉक्टर म्हणून मी चुकीचा ठरेल. तर दुसरीकडे डॉक्टर म्हणून मी मास्क नाही काढायचं ठरवलं आणि तरीही पेशंट नाही जगला तर मारणाऱ्याला शेवटचं पाणी देखील देऊ शकलो नाही हा विचार मनात डिवचत राहणार .तरीही आपल्यात मनात कसलेच विचार न घेऊन काहीही न आठवता सोबत असलेल्या नातेवाईकांना थोड पाणी द्यायला सांगितले . कारण शेवटी त्यांनी पेशंट 20 minute पूर्वी o2 शिवाय घरी हून तसाच आणलेला.दिल्यानंतर मी लगेच 02 लावला.असे अनेक पेशंट नेहमी येत असतात मलाच नव्हे तर सर्वाना हा अनुभव कधी ना कधी येणार आहे किंवा येऊनही गेलेला असेल. 

कोरोनाच्या काळात हेल्थकेअर वर्कर्स म्हणून आम्ही सगळेच अशा अनेक परिस्थितींशी रोज लढतो आणि जिंकतो देखील..
कधी माणूस म्हणून तर कधी डॉक्टर म्हणून..
कारण,
लढण्याचा इतिहास आमचा,
हरणे माझ्या रक्तात नाही,
जो वर मैदानात उभा मी,
जिंकणं नियतीला शक्य नाही.Corona च्या काळात नटसम्राट बनता येत नाही पण Corona योद्धा च बनाव लागत. 
   

   DR NILESH BHALERAO 
@crazycervix 

Related Posts:

  • स्‍वाइन फ्ल्‍यू म्हणजे काय? व कोरोना आजार म्हणजे काय??स्‍वाइन फ्ल्‍यू म्हणजे काय?कोरोना आजार म्हणजे काय?? वुहान या शहरात Corona लागण व उद्रेक झाल्‍याचे लक्षात आले आणि त्‍यानंतर चीन, अमेरिका, ब्रिटनसह जगभरात या रोगाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. या संदर्भात आरो… Read More
  • जलजमनी या पथरचट्टा और पौधे के फायदे पौधा जो कोरोना वायरस रोग में उपयोगी है, हिंदी में इसे "जलजमनी" या "पथरचट्टा" भी कहा जाता है।  पौधों को कई तरह से पहचाना जा सकता है।  उसका मराठी नाम "वासनवेल", वासनवेल या पातालगुड़ी शास्त्रीय नाम है - कोक्यूलस हिर्सुटस  वैज्ञा… Read More
  • Mask a Weapon in COVID pandemic In this era of Corona panic and fear, there are lot of confusions and misconceptions existing regarding the use of mask, not only amongst the lay persons but also among the health care providers.On one hand masks are not… Read More
  • Coronavirus Disease and Laboratory Testing(Corona वायरस आणि विषाणू निदान करीता चाचण्या)सध्या  आपल्याला ऐकण्यात येते, टेस्ट एका लॅब मध्ये पोसिटीव्ह आली आणि दुसरीकडे नेगेटिव्ह..! कोरोना टेस्ट नेगेटिव्ह असूनही डॉक्टर रुग्णाला कोरोना झाला असे म्हणत आहेत..! हा भ्रम कशामुळे? त्यासाठी खालील गोष्टी समजून घ्या.कोरो… Read More
  • Cocculus Hirsutus And Coronavirus disease Cocculus Hirsutus Plant extract useful in developing Antiviral covid 19 drug ;it true?Yes ,its true.In India ,there is research going on and also  trial on antiviral covid 19 drug from Cocculus Hirsutus Plant.So to under… Read More

3 comments: