Wednesday, September 23, 2020

वासनवेल व औषधी(Cocculus Hirsutus and Corona virus Drug)

Corona virus आजारात उपयुक्त ठरणारी  वनस्पती तिचे मराठीत नाव आहे " वासनवेल", वासनवेल किंवा पातालगरुडी 
शास्त्रीय नाव- (कोक्युलस हिर्सुटस)"Cocculus_hirsutus

हिंदी मध्ये तीला "जलजमनी" किंवा "पत्थरचट्टा" असही म्हणतात.

English: ब्रुम क्रीपर Broom Creeper,  ink berry।

उडीया: मुस्कानी

उर्दू: फ़रीद बूटी

कन्नड: डागडी बाली, डागडी सोपु, कागे मारी

तमिल: कट्टू-क-कोटी

तेलुगु: चीपुरू-टीगा, दुसरीतीगा, कटलाटीगे

पंजाबी: फरीद बूटी

बंगाली: हूयेर

मराठी: वासनवेल।

मलयालम: पाथालगरूडाक्कोटी, पाथालमूली




 अनेक अर्थाने वनस्पतीची ओळख करून देता येईल. 
नपुंसकालाही मर्दानगी प्रदान करणारी व विज्ञानाच्या कक्षा ओलांडणारी ही वनस्पती. 

या वनस्पतीची वेल देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाळ्यात येते. काही ठिकाणी ती बारमाही उपलब्ध असते.
 या वनस्पतीच्या पानांमध्ये आणि मूळांमध्ये औषधी गुणधर्म असतात.

करोनासह विविध आजारांवर बहुउपयोगी :वासनवेल 

विविध आजारांवर उपयुक्त :
डोकेदुखी, डोळ्यांची साथ, दातदुखी, पोटदुखी, अतिसार, त्वचेचे रोग अशा विविध आजारांवर उपचारांसाठी परंपरागत या वनस्पतीचा वापर केला जातो. 

करोना संसर्गावरील उपचारासाठी वनस्पतीचा समावेश असलेले (फायटो फार्मास्युटिकल) 'एक्यूसीएच' हे देशातील पहिले औषध लवकरच उपलब्ध होऊ शकते. 


वंध्यत्व आणि वासनवेल:
शेळी ,बोकड ,मेंढी आवडीने ह्या वनस्पतीच सेवन करून भरपुर संतती पैदास करतात. मित्रांनो वासनवेलीचा वेल खडीसाखर व काळीमिरी सोबत नियमित सेवन केल्यास शुक्रधातु किंवा शुक्र जंतुची झपाट्याने वाढ होऊन संतती सौख्य लाभते. महिलामधे श्वेतप्रदर किंवा रक्त प्रदर आजारामधे हाच फाॅर्मुला उपयुक्त ठरतो. शरीरात अन्न पचनाच्या तक्रारी याच्या सेवनाने दुर होतात. वासनवेल वाळवुन या पानांची पावडर करून एखाद्या भांड्यात घालून पाणी मिसळावे व झाकून ठेवायचे. नंतर दोन तासाने उघडायचे.त्याला चाकुने कापावे लागते इतका घट्टपणा आणण्याची किमया या वनस्पतीची आहे. वासन वेल शक्तीशाली आहे,तिचा रस पाण्यात टाकला तर पाणी थोड्याच वेळात दह्या सारखे घट्ट होते, वाटित पाणी घेऊन पहा,परमेश्वराने प्रत्येक रोगावर वनस्पती निर्माण करुन ठेवली आहे.

एक इकाॅलाॅजिकल इंडिकेटर:वासनवेेेेल

वासनवेल जमिनीतील पाणीपातळी सांगणारी एक इकाॅलाॅजिकल इंडिकेटर म्हणुन काम करते.कोणत्याही वनस्पतीला जगण्यासाठी पाणी लागते.मोठ्या झाडांच्या मुळया खोलवर पाणी शोधत असतात पण ह्या छोट्या वेलीच्या मुळया उभ्या उतरंडया खडकात चाळीस ते पन्नास फुटापर्यत पाणी शोधत जातात यामुळेच हिला जलजमनी किंवा पत्थरचटटा म्हणतात. उन्हाळ्यात कुठेच पाणी नसताना ही वेल हिरवीगार असते.हिला पाहुन अनेक पानाडी ह्या वनस्पतीजवळ पाण्याचे बोअरवेल किंवा विहीरीचे अंदाज सांगतात.

वासनवेल व सहदेव भाडळी:
पुराणातील सहदेव भाडळी ग्रंथामधे या वनस्पतीवर खुप लिखाण आहे पण आता भुजलपातळी खालावल्याने हे अंदाज ब-याचवेळी खोटे ठरत आहेत. भुजलसंशोधन करताना विहीर खणताना विशीष्ठ खडकांचे व पाण्याचे अंदाज तंतोतंत खरे निघाले. पण ह्यासाठी या वेलीचे त्या क्षेत्रात किती प्रमाण आहे याचा विचार करूनच अंदाज सांगावा लागतो.हिरवा किंवा तांबडा मुरुम.तसेच पिवळा पण उभ्या सळाचा म्हणजे उतरंडीसारखा खडक किंवा रुपांतरीत अग्नीजन्य खडकात या वेलीचे वास्तव्य जास्त प्रमाणात आढळून येते.


वासनवेल विकसित AQCH औषधी व Corona विषाणू आजार 
•केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी), वैज्ञानिक आणि औद्योगिक विकास परिषद (सीएसआयआर) आणि सन फार्मास्युटिकल्स यांच्या एकत्रित प्रयत्नांतून 'वासनवेल' या वनस्पतीपासून हे औषध विकसित करण्यात आले आहे.
• डेंगीवरील उपचारांसाठी विकसित करण्यात आलेले 'AQCH' हे औषध करोना विषाणूसह अनेक प्रकारच्या विषाणू संसर्गावर प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगांमध्ये आढळून आले आहे. •विषाणूरोधी गुणधर्म असल्यामुळेच सनफार्माने वासनवेलच्या अर्कापासून तयार केलेल्या 'एक्यूसीएच' या औषधामुळे डेंगी, करोनासह विविध विषाणूंचा संसर्ग कमी होत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे.


•'AQCH'च्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या (मानवी सुरक्षा आणि लहान प्राण्यांचा समावेश असलेल्या) यशस्वीरीत्या पार पडल्या असून, जूनपासून या औषधाच्या 'कोव्हिड १९' च्या रुग्णांवर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. 
•चाचण्यांचे निष्कर्ष ऑक्टोबरमध्ये येणे अपेक्षित आहेत. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष आश्वासक असल्यास, तातडीची गरज म्हणून हे औषध करोनाच्या रुग्णांसाठी त्वरित उपलब्ध होऊ शकते. नाहीतर, औषधाची पुरेशी चाचपणी करण्यासाठी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू होऊ शकतो.
रोगप्रतिकारक शक्ति  कशी वाढवावी नैसर्गिक पद्धतीनेच Herbs हा लेख वाचायचा असल्यास click करा >>>

कोव्हिड उपचारांमध्ये व उपचारांसाठी विकसित करण्यात आलेले हे औषध करोनाच्या रुग्णांसाठी  प्रभावी सिद्ध आलेले 'एक्यूसीएच' हे औषध  त्वरित उपलब्ध होऊ शकते.


वासनवेल
@crazycervix 
 


0 comments:

Post a Comment