Friday, September 25, 2020

स्‍वाइन फ्ल्‍यू म्हणजे काय? व कोरोना आजार म्हणजे काय??

स्‍वाइन फ्ल्‍यू म्हणजे काय?कोरोना आजार म्हणजे काय??
वुहान या शहरात Corona लागण 
व उद्रेक झाल्‍याचे लक्षात आले आणि त्‍यानंतर चीन, अमेरिका, ब्रिटनसह जगभरात या रोगाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. या संदर्भात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्‍या आणि हा रोग इतरत्र पसरू नये यासाठी प्रयत्‍न केले जात असले तरीही त्याची व्‍याप्‍ती वाढत ते भारतापर्यंत आणि पुण्‍यातही येऊन पोचली आहे. दक्षता म्‍हणून जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर केली आहे. शासन पातळीवरून प्रयत्‍न केले जात असले तरीही प्रत्‍यक्ष नागरिकांनीही दक्षता घेण्‍याची आवश्‍यकता आहे.स्वाइन फ्लू या आजाराचे ही तसेच आहे.
स्वाइन फ्लू  कसा होतो?
मुख्‍यतः डुकरांमध्‍ये टाईप ए एनफ्ल्‍युएन्‍जा H1N1 विषाणुंच्‍या संक्रमणामुळे स्‍वाइन फ्ल्‍यूची लागण होते. या रोगाचा संबंध मुख्‍यतः श्‍वसन प्रक्रियेशी येत असल्‍याने यास श्‍वास रोग असेही काही ठिकाणी म्‍हणतात.सामान्‍यतः या रोगाचा विषाणू मनुष्‍यावर प्रभावी ठरत नाही अशी धारणा होती. मात्र गेल्‍या काही वर्षांत समोर आलेल्‍या संशोधनानुसार या रोगाच्‍या विषाणुची लागण आता मनुष्‍यालाही होऊ लागली आहे. या रोगाचा फैलाव मुख्‍यत्वे वराह पालन करणारे आणि त्‍यांचे मांस विक्री किंवा भक्षण करणारे यांच्‍याद्वारे होण्‍याची दाट शक्यता असते.अतिशय वेगाने पसरणा-या या रोगाची लक्षणे सर्वसामान्‍य फ्ल्‍यू सारखीच असतात. शिंकणे, खोकणे, संक्रमित सार्वजनिक वापराच्‍या वस्‍तूंना हाताळणे किंवा श्‍वासाद्वारेही या रोगाचा वेगाने फैलाव होऊ शकतो. 1976 मध्‍ये सर्वप्रथम या रोगाची ओळख झाली.

कोरोना आजार कसा होतो??
संसर्गजन्य आजार आहे. मुख्‍यतः श्‍वसन प्रक्रियेशी सम्बन्धित च आजार आहे. COVID-19 आजार हा Corona virus मुळे होतो. अतिशय वेगाने पसरणा-या या रोगाची लक्षणे सर्वसामान्‍य फ्ल्‍यू सारखीच असतात काही अपवाद वगळता. खोकणे, संक्रमित सार्वजनिक वापराच्‍या वस्‍तूंना हाताळणे किंवा श्‍वासाद्वारेही या रोगाचा वेगाने फैलाव होऊ शकतो. 2019 वुहान या शहरा मध्‍ये सर्वप्रथम या रोगाची ओळख झाली.


स्वाइन फ्लू साठी उपलब्ध औषधि??
Tamiflu किंवा Relenza किंवा Fluvir यासारखी औषधे आहेत. मात्र या रोगापासून बचावासाठी आधीच ही औषधे अजिबात घेऊ नयेत. याशिवाय या आजारापासून बचावासाठी तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते.

CORONA  व Swine flu रोगाची लक्षणे काय आहेत? 

सामान्‍य मानवी फ्ल्‍यू प्रमाणेच याची लक्षणे आहेत. ताप येणे, खोकला येणे, घशाला कोरड पडणे, अंग व डोकेदुखी आणि मळमळून उलट्या होणे, दम लागतो, छातीत दुखते, चव व वास येत नाही ही  प्रमुख लक्षणे आहेत.

या दोन्ही रोगापासून बचावाचे उपाय?

या रोगाची लागण आणि संसर्ग होऊ नये यासाठी नाक आणि तोंड मास्‍कने झाकून ठेवणे उत्तम. सार्वजनिक स्‍वच्‍छता गृहाच्‍या नळाचा, गाडीच्‍या दरवाज्‍याचा, सायबर कॅफेवरील माऊस किंवा कीबोर्डचा वापर केल्‍यानंतर हात साबणाने वरचेवर स्‍वच्‍छ करावेत. जर आपल्‍यात अशा प्रकारच्‍या रोगाची लक्षणे दिसत असतील. तर त्‍वरित डॉक्टरांचा सल्‍ला घेऊन घरीच थांबलेले बरे.

स्‍वाइन फ्ल्‍यूवर उपाय आहेत का?

होय, आहेत. 

कोरोना आजार उपाय काय आहेत??
लक्षणानुसार उपचार चालू आहेत. त्यातल्या त्यात Remedesevir,Hydroxycholoquine, Favipiravir, Tocilizumab हे पेशंट ला गरजेनुसार देत आहेत.
@crazycervix 

0 comments:

Post a Comment