Testing of COVID-19 disease

covid pandemic disease and laboratory investigations

Tulsi in Various diseases

Tulsi in Various diseases and best role in covid19 pandemic.

Cocculus_hirsutus

Cocculus_hirsutus and Covid19 disese

Immunity booster Herbs

Immunity Booster Herbs And Diet

Turmeric Benefits

Turmeric Powder Benefits As A Immunity Booster .

Saturday, August 22, 2020

Inconclusive COVID-19 test report म्हणजे काय?

COVID-19 टेस्ट चा रिपोर्ट  Inconclusive असणे म्हणजे काय?

हे समजण्या साठी कोरोना बद्दल थोडी अधिक माहिती समजून घ्यावी लागेल.

Coronavirus family एकूण 4 genus मध्ये विभागली जाते - alpha, beta, gamma आणि delta. 

त्यापैकी Betacoronavirus (Beta-CoVs) याचे मानवी संसर्गामध्ये विशेष महत्व आहे.  

Beta-CoV च्या A, B आणि C अश्या वंशावळी आहेत. 
त्यापैकी A वंशावळी मध्ये OC43 आणि HKU1 प्रजाती येतात. 
OC43 संसर्गामुळे साधी सर्दी होते आणि HKU1 संसर्गामुळे सर्दी, न्यूमोनिया होतो. 
B वंशावळी मध्ये SARS-CoV आणि SARS-CoV-2 या प्रजाती येतात. 
SARS-CoV मुळे SARI (severe acute respiratory illness) आजार होतो आणि SARS-CoV-2 या प्रजातीमुळे COVID-19 आजार होतो.
C वंशावळी मध्ये MERS ही प्रजाती येते. 
COVID-19 आजाराचे निदान करताना screening आणि confirmatory टेस्ट केली जाते. 
Screening टेस्ट मध्ये E gene तपासला जातो. हा E gene सर्व Beta-CoV मध्ये असतो. याचाच अर्थ तो OC43, HKU1, SARS-CoV, SARS-CoV-2 आणि MERS या विषाणू प्रजातींपैकी कुणाचाही असू शकतो. त्यामुळे ज्या सॅम्पल मध्ये E gene आढळून येतो त्या सॅम्पलची confirmation टेस्ट केली जाते. त्यासाठी COVID-19 या प्रजातीमध्येच सापडणारे RdRP आणि ORF1b genes तपासले जातात. शेवटी ज्या सॅम्पल मध्ये E gene आणि RdRP व ORF1b पैकी कुठलाही एक gene आढळून येतो त्याला COVID-19 आजारासाठी positive रिपोर्ट केला जातो आणि ज्या सॅम्पल मध्ये फक्त E gene आढळतो आणि RdRP/ORF1b आढळून येत नाही त्या सॅम्पल ला Inconclusive असे रिपोर्ट केले जाते.

*Inconclusive रिपोर्ट असलेल्या पेशंट मध्ये 3 शक्यता असतात.*

१. पहिली शक्यता म्हणजे - त्या रुग्णाला COVID-19 आजाराची सुरुवात असू शकते पण संसर्गाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये viral load कमी असल्याकारणाने Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load वाढून तो positive येऊ शकतो.

२. दुसरी शक्यता- त्या रुग्णाला काही दिवसांपूर्वी COVID-19 चा संसर्ग झालेला असू शकतो आणि आता viral load कमी होत असल्यामुळे Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load आणखीन कमी होऊन तो negative येऊ शकतो.

३. तिसरी शक्यता- त्या रुग्णाला COVID-19 आजार नसून वर नमूद केलेल्या Beta-CoV च्या वंशावळीतील विषाणूंचा संसर्ग असेल आणि असे रुग्ण परत परत Inconclusive येतात.
वाचा >>

Copyright Disclaimer @crazycervix

Friday, August 21, 2020

Corona Warrior किंवा Corona योद्धा....


करोना उद्रेक च्या सुरूवातीला जी सर्वसामान्य माणसात  जी भिती होती तिच भिती थोडीफार का होईना आमच्या सारख्या Doctor मंडळीना ही होतीच....सुरुवातीला म्हणजे 2 महिन्यापुर्वी मी व माझे सहकारी मित्र Corona virus बद्दल खूप सारी माहिती गोळा करत होतो व करणारच.
MBBS 2nd वर्षात Microbiology हे विषयाचे पुस्तक..Microbiology या विषयातील virology ....त्यातून फक्त CORONAVIRUS कुठे आहे तो शोधला 
...या विषाणूच्या वेगवेगळ्या  प्रकाराबाबत माहीती जास्त माझ्याकडे कडे अथवा कोणत्याही डॉक्टर कढे नसणारच. आणि Microbiologist शिवाय कोणाकडेच माहिती जास्त नव्हतीच..
कारण आपण काही #Microbiology या विषयातील तज्ज्ञ नव्होत.व त्या साठी मी तरी  Virus बद्दल संपूर्ण वाचून काढले..त्याबाबत उपचारासाठी काय उपयोगी आहे?काय  करावे हे सर्व basic माहीत करून घेतले खूप similarity असलेला #Contagion हा English Movie बघावा लागला..

खरे पाहता ,एमबीबीएस करत असताना या दुर्लक्षित #VIRUS कडे कोणीही जास्त लक्ष दिलेले असेल असे वाटत नाही. आणि त्याच विषाणू चा उद्रेक होईल असे कोणालाही  माहित नव्हते .जर का या #VIRUS बद्दल  माहिती असते तर या विषाणू चा प्रसार होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व जगातील लोकांना  या लसीचा शोध आधीच लागून  या विषाणू ची लस  लसीकरणा दरम्यान सरसकट दिली असती.व उद्रेक होऊ दिला नसता...असो..

 आतापर्यंत जे झालय  युद्धमय परिस्थिती ची सुरूवात... Covid19 संक्रमण ला निर्भीड पणे सामोरे जावेच लागणार असल्यामुळे Frontliner साठी आता डॉक्टरांची फौज वाढवणे गरजेचे आहे..त्यामुळे Corona virus infection disease या महामारी ला रोखण्यासाठी वा युद्ध करीता Corona योद्धा किंवा Covid Warrior ची गरज आहे.डॉक्टरांना प्रोत्साहित करण्यासाठी अवार्ड्स देण्यात येत आहेत. 

Covid योद्धा 
ही उपाधी देत Doctors Frontline ला काम करत आहेत. खरे खरे युद्धे जरी डॉक्टर असले तरी त्यांना वेळ वेली मदत करणारे ते सुध्दा योद्धा च होत. 


@DRNILESH

Thursday, August 20, 2020

Coronavirus Disease and Laboratory Testing(Corona वायरस आणि विषाणू निदान करीता चाचण्या)

सध्या  आपल्याला ऐकण्यात येते, टेस्ट एका लॅब मध्ये पोसिटीव्ह आली आणि दुसरीकडे नेगेटिव्ह..! कोरोना टेस्ट नेगेटिव्ह असूनही डॉक्टर रुग्णाला कोरोना झाला असे म्हणत आहेत..! हा भ्रम कशामुळे? त्यासाठी खालील गोष्टी समजून घ्या.

कोरोना च्या साठी मुख्यतः या टेस्ट केल्या जातात.

1. RT PCR swab 

2. TruNat/CB NAAT swab 

3. Antigen test 

4. Antibody test (Ig M आणि Ig G)

Symptoms असेल  तर अन्य तपासण्या करण्याची पण गरजेचे आहे त्यात HRCT Chest,Chest Xray,ECG, USG, इतर लॅबोरेटरी टेस्ट्स(CBC,Se Creatinine,BSL , Dengue test, SGPT, Urine Routine microscopy,Sr.Ferritin, CPK,CRP, D-dimer, Sr.Electrolytes,Inflammatory markers.

प्रथम तीन टेस्ट सध्या कोरोना असलेल्या व्यक्तीमध्ये पोसिटीव्ह येत असतात.

Antigen test ही active संसर्ग असलेल्या व्यक्ती मध्ये positive येत असते.  Ig M Antibody test antibody टेस्ट सध्या आजार असलेल्या आणि ठीक होत असलेल्या मध्ये पोसिटीव्ह येत असते. Ig G antibody ही टेस्ट आजार ठीक होऊन गेलेल्या लोकांमध्ये पोसिटीव्ह येत असते.

*Rapid Antibody test मध्ये Patient चे रक्त घेतले जाते. 

*Rapid ANTIGEN test मध्ये Patient चे नाकातून स्राव(Nasal swab),Nasopharyngeal Swab घेतला जातो.

*RTPCR या Test मध्ये नाकातून,फुप्फुसातून (BAL),नाकाच्या पोकळीतून, घशातून तपासणी करता घेतला जातो.

ह्या सर्व टेस्ट मध्ये ही काही कमतरता असतात. ह्या कोरोनाचे लक्षण असूनही सर्वच्या सर्व कोरोना रुग्णांमध्ये पोसिटीव्ह येत नसतात. रुग्णाला कोरोनाची लक्षणे असूनही टेस्ट नेगेटिव्ह असू शकते. असे का होते? बऱ्याच गोष्टीवर टेस्ट result अवलंबून असतात. 



१. वेळ: आपण टेस्ट लक्षणांच्या सुरुवातीच्या 2-3 दिवसात किंवा खूप उशिरा जसे की 12-14 दिवसानंतर केली तर कोरोना आजार असूनही टेस्ट negative येऊ शकते. 

२. टेस्ट चा प्रकार: RT PCR ही टेस्ट 10 कोरोना रुग्णामध्ये 7 मध्येच पोसिटीव्ह येत असते. Antigen टेस्ट ही फक्त 50% कोरोना रुग्णामध्ये पोसिटीव्ह येत असते.

३. Swab घेण्याची जागा: घश्यापेक्षा नाकातून swab घेतला तर स्वब पोसिटीव्ह येण्याचे जास्त चान्स असतात.

४. Technical प्रॉब्लेम: अशा बऱ्याच छोट्या छोट्या बाबी असतात.

Swab नेगेटिव्ह आल्यास मग निदान कसे होणार?

1. छाती चा CT स्कॅन वर बऱ्याच रुग्णामध्ये निदान करता येते (आजाराची लक्षणे नसलेल्या रुग्णामध्ये सुद्धा). पण ही तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावी. 

2. रुग्णाची पूर्ण history, कोरोनाची लक्षणे आणि शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण (पल्स ऑक्सिमीटर च्या साहायाने) तपासून डॉक्टर कोरोनाचे अचूक निदान करू शकतात.


कधी कधी रिपोर्ट, Inconclusive पण येतो.

*Inconclusive रिपोर्ट असलेल्या पेशंट मध्ये 3 शक्यता असतात.*

१. पहिली शक्यता म्हणजे - त्या रुग्णाला COVID-19 आजाराची सुरुवात असू शकते पण संसर्गाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये viral load कमी असल्याकारणाने Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load वाढून तो positive येऊ शकतो.

२. दुसरी शक्यता- त्या रुग्णाला काही दिवसांपूर्वी COVID-19 चा संसर्ग झालेला असू शकतो आणि आता viral load कमी होत असल्यामुळे Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load आणखीन कमी होऊन तो negative येऊ शकतो.

३. तिसरी शक्यता- त्या रुग्णाला COVID-19 आजार नसून वर नमूद केलेल्या Beta-CoV च्या वंशावळीतील विषाणूंचा संसर्ग असेल आणि असे रुग्ण परत परत Inconclusive येतात.

Inconclusive COVID-19 test report म्हणजे नेमके kay? वाचा 

immunity booster Tulsi and Turmeric

अश्या प्रकारे निदान करून (swab negative किंवा Inconclusive असताना सुद्धा) कोरोना चा इलाज आवश्यक असतो. Swab negative किंवा Inconclusive समजून, डॉक्टरांवर विश्वास न ठेवता इलाज नाही करणे रुग्णाला नुकसानदायक ठरू शकते. अशा रुग्णापासून आजार दुसर्यांना पसरू शकतो. त्यासाठी टीव्ही व इतर प्रसार माध्यमाच्या भ्रामक न्युज पासून दूर राहा. डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार करा. हा आजार बऱ्याच रुग्णामध्ये लक्षण विरहित असतो, पण मधुमेही वृद्ध इत्यादी अशा लोकांना धोकादायक ठरतो. 

Laboratory Testing In Coronavirus disease..

@crazycervix