Friday, September 25, 2020

Corona बद्दल ची मानसिकता

हल्ली रुग्णास कोरोना टेस्ट (rapid antigen /RT-PCR)
करून घेण्याचा सल्ला दिला तर  पेशंट नाराज होतात 
किंवा डॉक्टर ला कळत नाही, डॉक्टर उगीच भीती दाखवतात असा गैरसमज करून घेऊन काही रुग्ण दिलेला सल्ला टाळतात व काही दिवस अंगावर काढून गंभिर लक्षणे  निर्माण झाल्यावर परत येतात मग डॉक्टर तुमचे ऐकले असते तर बरं झालं असत लवकर मोठया ठिकाणी गेलो असतोत, हे पश्चताप व्यक्त करतात 
यातून शिकलेल्या महत्वाच्या गोष्टी...

१. कोविड हा अत्यंत गंभीर आजार असून त्याला कोणीही "काही होत नाही" म्हणून कॅज्युअली घेऊ नका. तरुण, म्हातारे, लहान मुल कोणालाही कोविड होऊ शकतो.

२. कोविड पूर्ण बरा होतो हेही तितकंच खरं, पण त्यासाठी लवकर निदान व उपचार खुप महत्वाचे. त्यामुळे कोणतीही लक्षणं दिसल्यास लगेच चाचणी करून घ्या, आणि चाचणी negative आली व त्रास जर होतच असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने पुढील काही तपासण्या करून घ्या. अंगावर काढू नका. योग्य उपचाराने कोरोना बरा होतो. ( सध्या कोणतीही लक्षणे कोरोना मध्ये दिसत आहेत. त्यामुळे मला मागच्यावर्शी, २ वर्षाआधी असचं झालत हे डॉक्टर ला न सांगता डॉक्टर च म्हणणं ऐकून घ्या)

३. कोरोनाची लढाई तुम्हाला एकट्यालाच लढावी लागते, इच्छा असूनही इथे तुमच्या शेजारी कोणी येऊन बसू शकत नाही. त्यामुळे, लढायचं आणि जिंकायचं हे डोक्यात ठेवायलाच हवं!

४. सकस आहार, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि औषधे ही कोरोनाला हरवायचे मोठे शस्त्रे आहेत. त्यांचा नीट वापर केल्यास आपण कोरोनामुक्त होतो.

५. जे कोरोनातून यशस्वी होऊन बाहेर पडले आहेत. त्यानी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर लगेच जोराने कामाला लागू नये. कोरोनाचा विषाणू जरी गेला असला तरी फुफ्फुसाला पूर्ण रिकव्हर व्हायला वेळ द्यावा लागतो. असा वेळ न दिल्याने निगेटिव्ह आल्यावरही पुन्हा ऍडमिट व्हायच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्यातून कॉम्प्लिकेशन वाढतच आहेत. हे टाळायचे असेल तर पूर्ण विश्रांती घेणे सर्व पेशंटसाठी हिताचे आहे.

कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही, त्यामुळे, आपण सर्वांनीच योग्य ती काळजी घेऊन ही लढाई लढली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, शक्य तेवढे गर्दीत जाणे टाळणे हे महत्वाचे. त्यामुळे काळजी घ्या.

आम्ही तुम्हाला आमचा परिवार म्हणतोत ,काही संशयास्पद लक्षणे दिसली तरच test करायला सांगतो.

उगीच गैरसमज करुन घेऊ नका व काळजी घ्या!

0 comments:

Post a Comment