COVID-19 टेस्ट चा रिपोर्ट Inconclusive असणे म्हणजे काय?
Coronavirus family एकूण 4 genus मध्ये विभागली जाते - alpha, beta, gamma आणि delta.
त्यापैकी Betacoronavirus (Beta-CoVs) याचे मानवी संसर्गामध्ये विशेष महत्व आहे.
Beta-CoV च्या A, B आणि C अश्या वंशावळी आहेत.
त्यापैकी A वंशावळी मध्ये OC43 आणि HKU1 प्रजाती येतात.
OC43 संसर्गामुळे साधी सर्दी होते आणि HKU1 संसर्गामुळे सर्दी, न्यूमोनिया होतो.
B वंशावळी मध्ये SARS-CoV आणि SARS-CoV-2 या प्रजाती येतात.
SARS-CoV मुळे SARI (severe acute respiratory illness) आजार होतो आणि SARS-CoV-2 या प्रजातीमुळे COVID-19 आजार होतो.
C वंशावळी मध्ये MERS ही प्रजाती येते.
Screening टेस्ट मध्ये E gene तपासला जातो. हा E gene सर्व Beta-CoV मध्ये असतो. याचाच अर्थ तो OC43, HKU1, SARS-CoV, SARS-CoV-2 आणि MERS या विषाणू प्रजातींपैकी कुणाचाही असू शकतो. त्यामुळे ज्या सॅम्पल मध्ये E gene आढळून येतो त्या सॅम्पलची confirmation टेस्ट केली जाते. त्यासाठी COVID-19 या प्रजातीमध्येच सापडणारे RdRP आणि ORF1b genes तपासले जातात. शेवटी ज्या सॅम्पल मध्ये E gene आणि RdRP व ORF1b पैकी कुठलाही एक gene आढळून येतो त्याला COVID-19 आजारासाठी positive रिपोर्ट केला जातो आणि ज्या सॅम्पल मध्ये फक्त E gene आढळतो आणि RdRP/ORF1b आढळून येत नाही त्या सॅम्पल ला Inconclusive असे रिपोर्ट केले जाते.
१. पहिली शक्यता म्हणजे - त्या रुग्णाला COVID-19 आजाराची सुरुवात असू शकते पण संसर्गाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये viral load कमी असल्याकारणाने Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load वाढून तो positive येऊ शकतो.
२. दुसरी शक्यता- त्या रुग्णाला काही दिवसांपूर्वी COVID-19 चा संसर्ग झालेला असू शकतो आणि आता viral load कमी होत असल्यामुळे Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load आणखीन कमी होऊन तो negative येऊ शकतो.
३. तिसरी शक्यता- त्या रुग्णाला COVID-19 आजार नसून वर नमूद केलेल्या Beta-CoV च्या वंशावळीतील विषाणूंचा संसर्ग असेल आणि असे रुग्ण परत परत Inconclusive येतात.
वाचा >>>>>>>>》》》[Corona virus disease च्या तपासण्या ]
वाचा >>
Copyright Disclaimer @crazycervix
0 comments:
Post a Comment