Friday, October 9, 2020

Coronavirus disease झाले नंतर चा आहार

शाकाहारी हे खाऊ शकता.

* पूर्ण धान्य खा, उदा. हातसडीचा तांदूळ, पूर्ण गव्हाचे पीठ, ओट, ज्वारी वर्गीय धान्ये इ.

* शेंगा, कडधान्ये व बळींचा आहारात समावेश करा, यात भरपूर प्रथिने असतात.

* ताजी फळे व भाज्यांचा समावेश करा. (लाल ढोबळी मिरची, गाजर, बीट, हिरव्या भाज्या अशा गडद रंगाच्या भाज्या व फळे)

* ८-१० ग्लास पाणी प्या व शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवा, पाण्याने शरीरातील विषद्रव्ये निघून जाण्यास मदत होते.

* लिंबे, संत्री अशा आंबट चवीच्या फळांमधून भरपूर क जीवनसत्त्व मिळते, प्रतिकारशक्ती वाढवण्यास व रोगसंसर्गाशी मुकाबला करण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.

* आले, लसूण, हळद अशा मसाल्याच्या पदार्थांचे सेवन करा, याने रोगप्रतिकार शक्ती नैसर्गिकरीत्या वाढते.

* घरी शिजवलेले अन्न खा. कोलेस्टेरॉल कमी असलेले तेल स्वयंपाकासाठी वापरा.

* वापरण्यापूर्वी फळे व भाज्या धुवून घ्या. कमी फॅटचे दूध, दही घ्या कारण त्यातून भरपूर प्रथिने कॅल्शियम मिळते.

हे खाऊ नये:

* मैदा, तळलेले आणि जंक फूड (चिप्स, कुकीज इ.) खाणे टाळा.

* साखरयुक्त किंवा पॅकबंद फळांचे रस आणि कार्बनयुक्त पेये टाळा कारण त्यात पोषणमूल्ये कमी असतात.

* चीज, नारळाचे व पामचे तेल, बटर खाणे टाळा कारण त्यात असंपृक्त फॅटस् असतात आणि ती आरोग्यासाठी चांगली नाहीत.


मांसाहारी खाऊ शकता:

* ताजे पदार्थ आणि मांसाहारी वस्तू वेगवेगळ्या ठेवा.

* सोललेली कोंबडी (स्किनलेस चिकन), मासे, अंड्यातील पांढरा भाग अशा 'लीन' प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करा.

हे खाऊ नये

* मटण, लिव्हर, तळलेले व प्रक्रिया केलेले मांसाहारी पदार्थ टाळा.

* आठवड्यातून २-३ वेळांपर्यंत मांसाहार मर्यादित ठेवा.

* सबंध अंड्यांचे सेवन आठवड्यातून एक वेळपर्यंत मर्यादित ठेवा.


0 comments:

Post a Comment