Thursday, August 20, 2020

Coronavirus Disease and Laboratory Testing(Corona वायरस आणि विषाणू निदान करीता चाचण्या)

सध्या  आपल्याला ऐकण्यात येते, टेस्ट एका लॅब मध्ये पोसिटीव्ह आली आणि दुसरीकडे नेगेटिव्ह..! कोरोना टेस्ट नेगेटिव्ह असूनही डॉक्टर रुग्णाला कोरोना झाला असे म्हणत आहेत..! हा भ्रम कशामुळे? त्यासाठी खालील गोष्टी समजून घ्या.

कोरोना च्या साठी मुख्यतः या टेस्ट केल्या जातात.

1. RT PCR swab 

2. TruNat/CB NAAT swab 

3. Antigen test 

4. Antibody test (Ig M आणि Ig G)

Symptoms असेल  तर अन्य तपासण्या करण्याची पण गरजेचे आहे त्यात HRCT Chest,Chest Xray,ECG, USG, इतर लॅबोरेटरी टेस्ट्स(CBC,Se Creatinine,BSL , Dengue test, SGPT, Urine Routine microscopy,Sr.Ferritin, CPK,CRP, D-dimer, Sr.Electrolytes,Inflammatory markers.

प्रथम तीन टेस्ट सध्या कोरोना असलेल्या व्यक्तीमध्ये पोसिटीव्ह येत असतात.

Antigen test ही active संसर्ग असलेल्या व्यक्ती मध्ये positive येत असते.  Ig M Antibody test antibody टेस्ट सध्या आजार असलेल्या आणि ठीक होत असलेल्या मध्ये पोसिटीव्ह येत असते. Ig G antibody ही टेस्ट आजार ठीक होऊन गेलेल्या लोकांमध्ये पोसिटीव्ह येत असते.

*Rapid Antibody test मध्ये Patient चे रक्त घेतले जाते. 

*Rapid ANTIGEN test मध्ये Patient चे नाकातून स्राव(Nasal swab),Nasopharyngeal Swab घेतला जातो.

*RTPCR या Test मध्ये नाकातून,फुप्फुसातून (BAL),नाकाच्या पोकळीतून, घशातून तपासणी करता घेतला जातो.

ह्या सर्व टेस्ट मध्ये ही काही कमतरता असतात. ह्या कोरोनाचे लक्षण असूनही सर्वच्या सर्व कोरोना रुग्णांमध्ये पोसिटीव्ह येत नसतात. रुग्णाला कोरोनाची लक्षणे असूनही टेस्ट नेगेटिव्ह असू शकते. असे का होते? बऱ्याच गोष्टीवर टेस्ट result अवलंबून असतात. 



१. वेळ: आपण टेस्ट लक्षणांच्या सुरुवातीच्या 2-3 दिवसात किंवा खूप उशिरा जसे की 12-14 दिवसानंतर केली तर कोरोना आजार असूनही टेस्ट negative येऊ शकते. 

२. टेस्ट चा प्रकार: RT PCR ही टेस्ट 10 कोरोना रुग्णामध्ये 7 मध्येच पोसिटीव्ह येत असते. Antigen टेस्ट ही फक्त 50% कोरोना रुग्णामध्ये पोसिटीव्ह येत असते.

३. Swab घेण्याची जागा: घश्यापेक्षा नाकातून swab घेतला तर स्वब पोसिटीव्ह येण्याचे जास्त चान्स असतात.

४. Technical प्रॉब्लेम: अशा बऱ्याच छोट्या छोट्या बाबी असतात.

Swab नेगेटिव्ह आल्यास मग निदान कसे होणार?

1. छाती चा CT स्कॅन वर बऱ्याच रुग्णामध्ये निदान करता येते (आजाराची लक्षणे नसलेल्या रुग्णामध्ये सुद्धा). पण ही तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावी. 

2. रुग्णाची पूर्ण history, कोरोनाची लक्षणे आणि शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण (पल्स ऑक्सिमीटर च्या साहायाने) तपासून डॉक्टर कोरोनाचे अचूक निदान करू शकतात.


कधी कधी रिपोर्ट, Inconclusive पण येतो.

*Inconclusive रिपोर्ट असलेल्या पेशंट मध्ये 3 शक्यता असतात.*

१. पहिली शक्यता म्हणजे - त्या रुग्णाला COVID-19 आजाराची सुरुवात असू शकते पण संसर्गाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये viral load कमी असल्याकारणाने Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load वाढून तो positive येऊ शकतो.

२. दुसरी शक्यता- त्या रुग्णाला काही दिवसांपूर्वी COVID-19 चा संसर्ग झालेला असू शकतो आणि आता viral load कमी होत असल्यामुळे Confirmatory genes आढळून येत नाहीत. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जर पुन्हा चाचणी केली तर viral load आणखीन कमी होऊन तो negative येऊ शकतो.

३. तिसरी शक्यता- त्या रुग्णाला COVID-19 आजार नसून वर नमूद केलेल्या Beta-CoV च्या वंशावळीतील विषाणूंचा संसर्ग असेल आणि असे रुग्ण परत परत Inconclusive येतात.

Inconclusive COVID-19 test report म्हणजे नेमके kay? वाचा 

immunity booster Tulsi and Turmeric

अश्या प्रकारे निदान करून (swab negative किंवा Inconclusive असताना सुद्धा) कोरोना चा इलाज आवश्यक असतो. Swab negative किंवा Inconclusive समजून, डॉक्टरांवर विश्वास न ठेवता इलाज नाही करणे रुग्णाला नुकसानदायक ठरू शकते. अशा रुग्णापासून आजार दुसर्यांना पसरू शकतो. त्यासाठी टीव्ही व इतर प्रसार माध्यमाच्या भ्रामक न्युज पासून दूर राहा. डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार करा. हा आजार बऱ्याच रुग्णामध्ये लक्षण विरहित असतो, पण मधुमेही वृद्ध इत्यादी अशा लोकांना धोकादायक ठरतो. 

Laboratory Testing In Coronavirus disease..

@crazycervix

Related Posts:

  • Corona बद्दल ची मानसिकता हल्ली रुग्णास कोरोना टेस्ट (rapid antigen /RT-PCR)करून घेण्याचा सल्ला दिला तर  पेशंट नाराज होतात किंवा डॉक्टर ला कळत नाही, डॉक्टर उगीच भीती दाखवतात असा गैरसमज करून घेऊन काही रुग्ण दिलेला सल्ला टाळतात व काही दिवस अंग… Read More
  • Corona काळातील नटसम्राट ? नाही फक्त corona योद्धा "To पी or not to पी that is the question" (येथे पी हा इंग्रजीतला पी नसून मराठीतला पी आहे)पाणी द्यावं की नाही हा एकच सवाल आहे...एका मरणार्‍या माणसाला पाणी द्यावं की मरू द्यावं त्याला लाचार बेबस आणि तहानलेला.... .Of course पाणी… Read More
  • కోకులస్_హిర్సుటస్ चीपुरू-टीगा तेलुगु Blogకరోనా వైరస్ వ్యాధికి ఉపయోగపడే మొక్క మరాఠీ పేరు "వాసన్వెల్", వాసన్వెల్ లేదా పటల్గురి క్లాసికల్ పేరు - కోక్యులస్ హిర్సుటస్   శాస్త్రీయ నామం "కోకులస్_హిర్సుటస్"   హిందీలో దీనిని "జల్జమణి" లేదా "పఠార్చట్ట" అని… Read More
  • covid19 ही विषाणू महामारी कधी संपेल?Covid timeline काय?? कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात ? covid19 ही विषाणू महामारी  कधी संपेल? पेशंट ला एकदा Corona होऊन गेल्यावर परत कोरोना होतो का?हे आता या  ब्लॉग मध्ये पाहू.खरे पाहता,कोविड मध्ये कोणत्… Read More
  • COVID-19 Immunopathology  SARS-CoV-2 has a tropism for ACE2-expressing epithelial cells of the respiratory tract, patients with severe COVID‑19 have symptoms of systemic hyperinflammation.Pathogenesis of COVID-19The ACE2 enzyme plays a vital rol… Read More

5 comments: